आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावमधील त्यांचे कट्टर विरोधक काय म्हणाले, वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एकनाथ खडसे यांच्याशी माझे वैयक्तिक वैर नाही. विकासासाठी सर्वांनी त्यांना साथ दिली. लोकसभेत त्यांचे काम केले. जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा दूध संघात त्यांच्या सांगण्यावरून माघार घेतली. खडसेंनाच नेते मानले होते; परंतु त्यांनी संकुचित वृत्ती सोडली नाही. माझ्यानंतर भाजपच्या नेतृत्वाने त्यांना चांगले ओळखल्याने त्यांना स्वत:च्या कर्माने मंत्रिपद गमावण्याची वेळ आल्याचे सांगत शिवसेना उपनेते आमदार गुलाबराव पाटील यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा जाहीर समाचार घेतला. जळगावमधील आयोजित एका शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांचाही खडसेंवर हल्लाबोल-
जळगावमधील त्या 14 नगरसेवकांचा बळी कशाला देता? त्यापेक्षा खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे यांनी राजीनामा द्यावा असे आव्हान राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले.
काय म्हणाले गुलाबराव पाटील खडसे यांच्याबाबत...

- गेल्या 15 दिवसांच्या घडामोडींवर मी शब्दही बोललो नाही. खडसे आमचे नेते आहेत पण त्यांचे धंदे लक्षात आल्यानेच भाजपने पदावरून हकालपट्टी केली.

- मोदींच्या आश्वासन देण्याच्या जादूने मलाही वेड लावले होते. मोदी पंतप्रधान व्हावेत, म्हणून आम्ही लायकी नसलेल्या ए. टी. पाटलांसाठी मते मागत फिरलो. खडसेंच्या सुनेसाठी रात्रं-दिवस एक करून मते मागितली.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, गुलाबराव पाटील व सतीश पाटील यांनी कसा हल्लाबोल केला खडसेंवर....
बातम्या आणखी आहेत...