आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या नाराजीनंतरही सचिन अहिर सलमानच्या गँलेक्सी अपार्टमेंटवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता सलमान खानला सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला भेटायला गेलेल्या राज ठाकरे व नितेश राणेंवर शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. सार्वजनिक जीवनात काम करणा-या नेत्यांनी शिक्षा झालेल्या लोकांना लागलीच भेटायला जाणे चुकीचे आहे असे सांगत पवारांनी राजकीय नेत्यांच्या भेटीबाबत मत व्यक्त केले होते. मात्र, पवारांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे नेते व मुंबईतील माजी मंत्री सचिन अहिर यांनी शुक्रवारी रात्री सलमान खानच्या घरी जाऊन त्याचे सांत्वन केले.
विशेष म्हणजे पवारांनी शुक्रवारी दुपारीच दापोलीत याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतरही अहिर यांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपॉर्टमेंटवर हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पवार दुस-या पक्षांतील नेत्यांना खडे बोल सुनावत अनुभवाचे डोस पाजतात मात्र त्यांच्याच पक्षातील नेते त्यांचे म्हणणे ऐकत नाहीत का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
आपल्याला माहित असेलच की, 6 मे रोजी सलमान मुंबईतील सेशन्स कोर्टाने हिट अॅँड रन केसप्रकरणी दोषी धरीत 5 वर्षाची सक्तमजुरी सुनावली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे आमदार नितेश राणे भेटायला गेले होते. याचबरोबर काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्धीकी हे तर सलमानच्या संपूर्ण प्रकरणात धावपळ करताना दिसत होते. आता मुंबईतील राष्ट्रवादीचे वजनदार नेते सचिन आहिर यांनीही सलमान खानची भेट आपले व्यक्तिगत संबंध जोपासले आहेत.
बातम्या आणखी आहेत...