आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Shivsena, MNS Congress Now Providing Vegitable To Door To Door In Mumbai

शिवसेना, मनसेच्यानंतर आता मुंबईत कॉंग्रेस घरोघरी पोहोचवणार भाजीपाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मतदारांना आकर्षित करायचे तर त्यांच्या रोजच्या जगण्यातील समस्या दूर केल्या पाहिजेत, हे शिवसेनेचे सूत्र आता काँग्रेसनेही हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारपासून मुंबईकरांना शेतातून थेट भाजीपाला पोहोचवणार असल्याचे पक्षाने जाहीर केले. लवकरच राज्यभरात ही योजना सुरुवात करण्यात येणार आहे. शिवसेना आणि मनसेने अशीच योजना अगोदरच सुरू केलेली आहे.


शिवसेनेने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांना वडापावच्या गाड्या देण्याबरोबरच सणांच्या वेळी स्वस्तात साखर, मैदा, खाद्यतेल देण्यास सुरुवात केली होती. याचा त्यांना निवडणुकीत चांगला फायदा झाला. मनसेनेही अनेक ठिकाणी स्वस्त दरात भाजीपाला केंदे्र आणि खाद्यपदार्थ केंद्रे सुरू केली आहेत. दादरसारख्या ठिकाणी मनसेची स्वस्त दरातील भाजीपाल्याची गाडी लोकप्रिय आहे. हीच बाब लक्षात घेऊन पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी आयुक्त आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिका-यांबरोबर गुरुवारी एक बैठक घेतली. यात मुंबईत 106 भाजीपाला केंदे्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मुंबईकरांना 30 टक्के कमी दराने भाजीपाला मिळेल आणि आम्ही रोज भाजीपाल्याचे दर घोषित करू, असेही विखे यांनी सांगितले.


रमजानला स्वस्त फळे
रमजानचा महिना आल्याने स्वस्त दरात फळे द्यावीत, अशी मागणी नसीम खान यांनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली तसेच स्वस्त भाजीपाला केंद्र आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या बचत गटांच्या माध्यमातून सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ऑगस्टपासून ही संस्था भाजी विकताना दिसणार आहे. मंत्रालयातही एक भाजी विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे.