आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Shivsena Now Mim Opposes Tripti Desai Over Haji Ali Dargah Entry

दर्ग्यात घुसाल तर काळं फासू- शिवसेना नेत्यानंतर MIM ची तृप्ती देसाईंना धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तृप्ती देसाई उद्या (गुरुवारी) मुंबईतील हाजी अली दर्ग्याबाहेर जाऊन आंदोलन करणार आहेत. - Divya Marathi
तृप्ती देसाई उद्या (गुरुवारी) मुंबईतील हाजी अली दर्ग्याबाहेर जाऊन आंदोलन करणार आहेत.
मुंबई- भूमाता महिला ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई उद्या (गुरुवारी) मुंबईतील हाजी अली दर्ग्याबाहेर जाऊन आंदोलन करणार आहेत. यादरम्यान तृप्ती देसाई यांनी दर्ग्यातील माजरापर्यंत घुसण्याचा प्रयत्न केला तर चप्पलेचा प्रसाद देऊ अशी धमकी शिवसेनेचे नेते हाजी अराफत शेख यांनी दिल्यानंतर आता एमआयएमने यात उडी घेतली आहे.
एमआयएमचे मुंबईतील नेते हाजी रफत हुसैन यांनी म्हटले आहे की, जर तृप्ती देसाईंनी हाजी अली दर्ग्याच्या माजरापर्यंत घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या तोंडावर काळे फासून आम्ही त्यांचे स्वागत करू. यासाठी आमची टीम तयार आहे. तृप्ती यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे तृप्ती यांनी या प्रकरणात न पडणे हेच योग्य ठरेल असेही हुसैन यांनी म्हटले आहे.
हुसैन यांनी म्हटले आहे की, मजारपर्यंत महिलांनी जाणे इस्लामला मान्य नाही. आणि जे चुकीचे काम असते त्याला इस्लाम असे काही करायला परवानगी देत नाही. मग आम्ही तृप्ती देसाईंना असे कसू काय करू देऊ शकतो. तृप्ती देसाई दर्ग्यात येऊ शकतात मात्र मजारपर्यंत त्यांना जाता येणार नाही. तरीही त्यांनी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू व धडा शिकवू.
मुस्लिम महिला करणार तृप्ती देसाईंविरोधात आंदोलन
तृप्ती देसाई उद्या काही पुरोगामी मुस्लिम महिला संघटनांना सोबत घेऊन हाजी अली दर्ग्यातील माजरापर्यंत दर्शन घेता यावे यासाठी हाजी अली दर्ग्याबाहेर आंदोलन करणार आहेत. काही पुरोगामी मुस्लिमांचा तृप्ती देसाईंना पाठिंबा आहे तसेच दर्ग्यातील माजरापर्यंत पुरुषांप्रमाणेच महिलांनाही प्रवेश मिळाला पाहिजे या मताचे आहेत. मात्र, काही धार्मिक व कट्टर विचारांचे लोकांना हे मान्य नाही. तृप्ती देसाईंना काही मुस्लिमांचा पाठिंबा मिळत असल्याचे लक्षात येताच काही मुस्लिम संघटनांनी तृप्ती देसाई यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संघटना आज व उद्या देसाईच्या भूमिकेविरोधात आंदोलन छेडणार आहेत.