आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Telangana, Maharashtra Leaders Want Separate Vidarbha State

स्वतंत्र विदर्भासाठी आठवलेंचे आंदोलन; रिपाइंच्या भूमिकेमुळे सेनेची गोची, भाजप अनुकूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तेलंगण राज्यनिर्मितीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र विदर्भाची मागणी करावी, अशी जुनीच मागणी आहे. रिपब्लिकन पक्षाचा त्याला पाठिंबा आहे. केंद्राने आता विदर्भ राज्याचीही मागणी मंजूर करावी, या मागणीसाठी रिपाइंतर्फे 24 फेब्रुवारी रोजी विदर्भात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा खासदार रामदास आठवले यांनी बुधवारी दिला.
दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइंने भाजपप्रमाणेच विदर्भवादी भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा व आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाला विरोध करणारी भूमिका कायम ठेवली आहे. त्यातच युतीचा मित्रपक्ष भाजपने मात्र छोट्या राज्याचे सर्मथन करत स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा दिलेला आहे. त्यातच आता रिपाइंनेही भाजपच्या भूमिकेचे सर्मथन करून महायुतीत शिवसेनेला एकटे पाडल्याचे बोलले जाते. दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे यांनी मंगळवारीही स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला, तर शिवसेना नेत्यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सुशीलकुमार शिंदेंना भेटणार
आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छोटी राज्ये निर्मितीची संकल्पना मांडली होती. विदर्भाला भागाला न्याय द्यायचा असेल तर स्वतंत्र राज्य निर्माण करायलाच हवे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची आपण लवकरच भेट घेणार असल्याचेही आठवले यांनी नमूद केले.