मुंबई - समाजासाठी झटणा-यामहापुरुषांची स्मारके उभी करायची नाही, मग अफझलखानाचे थडगे उभे करायचे का? थोर पुरुषांची स्मारके उभारणे ही समाजाची भावना आहे. मात्र, एमआयएमकडून या भावना भडकवण्याचा नेहमीच प्रयत्न असतो, असा पटलवार शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी केला आहे.
एमआयएमचे अामदार इम्तियाज जलील यांनी स्मारके उभारण्यापेक्षा शाळा, रुग्णालये उभारा, अशा सूचना केल्या आहेत. एमआयएम समाजात भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. जलील धर्मनिरपेक्ष नागरिकांना संभ्रमात टाकून दिशाभूल करत आहेत. बाळासाहेब, मुंडे आणि शिवस्मारकाला विरोध करून, एमआयएम कट्टर मुस्लिम
आपल्या सोबत राहावे यासाठी धडपडत आहे. पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी महापुरुषांची स्मारकेही आवश्यक आहेत, असेही गो-हे यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.
महापुरुषांची प्रेरणा एमआयएमला नको
महापुरुषांनी आपल्या कार्याने, विचाराने समाजासमाेर आदर्श उभे केले आहेत. त्यांच्या आदर्शाचे सतत आपल्याला स्मरण व्हावे म्हणून अशी स्मारके हवीत. पण, स्मारकांना विरोध करून, एमआयएम महापुरुषांच्या विचारांना, कार्यालाच विरोध करत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.