आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांची पुन्हा अाॅनलाइन नाेंदणी; अाराेग्य विमा, घर खरेदीचा लाभ !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या कामगारांच्या नाेंदणीला ऊर्जितावस्था देण्याचा निर्णय कामगार मंत्रालयाने घेतला अाहे. त्यानुसार अाता सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना अाॅनलाइन नाेंदणीच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर अाणले जाईल. या नाेंदणीमुळे कामगारांना अाराेग्य, घर खरेदी, विमा असे विविध लाभ भविष्यात मिळणे शक्य हाेणार अाहे.

महाराष्ट्रात कामगारांची संख्या सुमारे ५० लाखांवर अाहे. परंतु गेल्या अनेक वर्षात या कामगारांची नाेंदणी झालेली नसल्याने ही कागदाेपत्री संख्या केवळ सहा लाख दिसते. परंतु कामगारांची नाेंदणी पुन्हा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मंजुरी मिळविण्यात अाली असल्याचे कामगार व काैशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर- पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

कामगारांची नाेंदणी करण्याकडे अातापर्यंत पुरेसे लक्ष देण्यात अाले नव्हते परंतु अाता त्यासाठी खास गेल्या दाेन महिन्यांमध्येअाॅनलाईन प्रणाली विकसित करण्यात अाली अाहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांची अाॅनलाईन नाेंदणी यापुढे करण्यात येणार असून यामध्ये माथाडी कामगारांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले. बांधकामावरील कामगारांना वारंवार स्थलांतरीत व्हावे लागते. त्यामुळे अशा कामगारांची नाेंदणी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन करण्यात येईल. नजिकच्या काळात ५० लाख कामगारांची अाॅनलाईन नाेंदणी करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

हेल्थकार्ड सुविधा देणार
सध्या सुरू असलेल्या राजीव गांधी जीवनदायी अाराेग्य याेजनेचा करार २० नाेव्हेंबरला संपत असून त्याएेवजी महात्मा फुले जीवनदायी अाराेग्य याेजना राबवण्यात येणार अाहे. या याेजनेची अंमलबजावणी दाेन अाॅक्टाेबरपासून हाेईल. राजीव गांधी अाराेग्य याेजनेच्या तुलनेत दुप्पट रुग्णालयांचा समावेश नवीन याेजनेत करण्यात अाला असून हजारापेक्षा जास्त उपचार सुविधा रुग्णांना मिळणार अाहे. कामगारांना देण्यात येणाऱ्या हेल्थकार्डाद्वारे केवळ इएसअाय रुग्णालयांमध्येच नाही तर या याेजनेत करारबद्ध असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेता येऊ शकेल. कामगारांसाठी असलेल्या विमा याेजनेचा फायदा अातापर्यंत विमा कंपन्यांनाच हाेत हाेता परंतु अाता या याेजनेमुळे कामगारांना माेफत किंवा कमी पैशात अाराेग्य सेवेचा लाभ घेता येऊ शकणार अाहे.

नाेंदणीचा फायदा
हेल्थ कार्ड ‘अाधार’शी संलग्न असल्याने कामगारांना अन्य काेणत्याही दस्तएेवजांची गरज भासणार नाही. नाेंदणीनंतर कामगारांची सर्व माहिती अाॅनलाइन असेल. याेजनेसाठी कामगार पात्र अाहे की नाही ते अाॅनलाइन माहितीवरून कळेल. हेल्थ कार्ड हरवले तरी त्याची अाेळख सुरक्षित राहून ताे लाभापासून वंचित राहू शकणार नाही. विमा हप्त्याचा खर्च सरकारच करेल.

स्वस्तात घर देणार
अावास याेजनेंतर्गत नाेंदणी केलेल्या कामगारांना स्वस्त घर याेजनेसाठी सहा लाख रुपये देण्याची याेजना अाहे. त्याचप्रमाणे बांधकामांच्या साइटवर काम करणाऱ्या नाेंदणीकृत कामगाराना घर खरेदी करण्यासाठी ५० हजार ते एक लाख रुपयांची तरतूद करण्याचा विचार अाहे. पण या रकमेबाबत अद्याप निर्णय घेण्यात अालेला नसल्याचे निलंगेकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...