आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्ये पुन्हा अतिरेकी हल्ल्याचा ALERT, २६/११ सारख्या हल्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई पुन्हा अतिरेक्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबईत लष्कर-ए-तोयबा ही अतिरेकी संघटना मोठा हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली आहे. यामुळे महाराष्ट्रात कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

राज्याच्या गुप्तवार्ता शाखेच्या अलर्टनुसार ८ ते १० अतिरेकी मुंबईत पुढील तीन महिन्यांत कोणत्याही वेळी हल्ला करण्याची शक्यता आहे. हे आत्मघाती अतिरेकी समुद्रमार्गाने मुंबईत येऊन स्थानिक लोकांच्या मदतीने मोठा घातपात घडवू शकतात. हा हल्ला
यापूर्वी मुंबईतील २६/११ हल्ल्यासारखाच असू शकतो. त्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. या अलर्टनंतर मुंबईच्या जीआरपीने शहरातील सर्व रेल्वे स्थानकांना एक पत्रक जारी केले आहे.

त्यात सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवणे व येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकावर करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयित हालचालींकडेही दुर्लक्ष न करण्यास सांगितलेले आहे. यानंतर पंचतारांकित हॉटेल्स व महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या घरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.