आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाभिक समाज आक्रमक; नागपुरात 11 हजार जण करणार मुंडन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारे नाभिक बांधव. - Divya Marathi
मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारे नाभिक बांधव.

मुंबई- मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात नाभिक समाज आक्रमक झाला असून 2 डिसेंबरपासून राज्यभर रास्ता रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे. 13 डिसेंबरला नागपुरात 11 हजार जण मुंडन करुन केस मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहेत.

 

पुण्यात केले होते वक्तव्य

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर, उद्यापासून मुख्यमंत्री ज्या ज्या कार्यक्रमात जातील, तिथे तिथे नाभिक समाजाकडून काळे झेंडे दाखवले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 नोव्हेंबर रोजी पुण्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक समाजावरुन वक्तव्य केले होते. आघाडी सरकारच्या काळातील सिंचन योजनांवर खर्च केलेल्या पैशांवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यासाठी त्यांनी नाभिकाचे उदाहरण दिले. दरम्यान, यावरुन मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे नाभिक महामंडळाची माफी मागितली आहे. तसेच आपल्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यावर दिलगिरी व्यक्त करत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

 

पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...