आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation Before The Sanjay Dutta Home By Students

मुन्नाभाईच्या घरासमोर निदर्शने,खोटे कारण देत पॅरोलवर सुटी घेण्‍याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व अभिनेता संजय दत्त याला वारंवार पॅरोलवर सुटी मिळत असल्याच्या निषेधार्थ मुंबईतील पाली हिल येथील त्याच्या बंगल्यासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पत्नी मान्यता आजारी असल्याचे खोटे कारण देऊन संजय दत्तने पॅरोल मिळवला असल्याचा आरोपही अभाविपने केला आहे.
पॅरोलवर सुटलेला संजय दत्त सध्या मुंबईत बंगल्या राहत आहे. गुरुवारी त्याच्या पाली हिल येथील घराबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी आंदोलकांपैकी काही कार्यकर्त्यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोनच महिन्यांपूर्वी दिवाळीत पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या आणि मुंबई बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात दोषी असलेल्या संजय दत्तला पुन्हा लगेचच पॅरोलवर महिनाभराची सुटी कशी दिली जाते, असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला. तसेच या वेळी पत्नीच्या आजारपणाचे कारण देत संजय दत्तने ही सुटी मिळवली, मात्र त्याची पत्नी आठवडाभरापूर्वी एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटसारख्या कार्यक्रमात दिसली असल्याचा आरोप अभाविपचे महामंत्री यदुनाथ देशपांडे यांनी केलाय. सुटी मिळवण्यासाठी खोटी माहिती दिल्याने हा न्यायालयाचा अवमान असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही देशपांडे यांनी केली.
दरम्यान, संजय दत्तला इतरांच्या तुलनेत अधिक सवलती दिल्या जात असल्याच्या आरोपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ‘याबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांना प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.