आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद डिजिटल स्मार्ट सिटीसाठी सामंजस्य करार, हेवलेट पॅकर्ड करणार तांत्रिक साहाय्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद, नाशिक व अमरावती शहरे डिजिटल स्मार्ट सिटी करण्यासाठी राज्य सरकारचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि हेवलेट पॅकर्ड एंटरप्रायजेस (एचपी)या जागतिक कंपनीशी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत राज्यातील अमरावती, औरंगाबाद व नाशिक ही शहरे डिजिटल स्मार्ट शहरे करण्यासाठी ही कंपनी तांत्रिक साहाय्य व भांडवल पुरवणार आहे. या तिन्ही शहरांच्या स्मार्ट सिटी व डिजिटल सिटीसंदर्भातील निविदेचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू होणार आहे. राज्यातील शहरे स्मार्ट व डिजिटल क्षमतेची करण्याचा प्रयत्न असून त्याअंतर्गत दहा शहरे स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...