आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Minister Eknath Khadse Comment On Farmer Loss Issue

पिकांच्या ३३ टक्क्यांवरील नुकसान भरपाईस पात्र- एकनाथ खडसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सातत्याने नैसर्गिक आपत्तीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या निकषात महत्त्वाचे बदल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यापूर्वी केवळ स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदीनुसार केळीला भरपाई दिली जात होती. मात्र, आता केळीला पंचनाम्यानुसार विमा कंपनीने भरपाई द्यावी. तसेच इतर पिकांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक नव्हे, तर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीला भरपाई देण्याची सूचना प्रस्तावात नमूद आहे, अशी माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

शनिवारी मसाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, हवामानावर आधारित पीक विम्याचा शाश्वत आधार केळी उत्पादकांना मिळाला पाहिजे. तसेच नुकसानीचा योग्य मोबदला मिळणेही गरजेचे आहे. म्हणून स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदीऐवजी प्रत्यक्ष स्पॉट पंचनामे विमा कंपनीने ग्राह्य धरावेत, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, असे खडसे यांनी सांगितले. कापूस वगळता नैसर्गिक आपत्तीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले शेतकरी यापूर्वी भरपाईसाठी पात्र ठरत होते. ज्या शेतकऱ्यांचे ४० ते ४५ टक्के नुकसान होत असे, त्यांना भरपाई मिळत नव्हती. त्यामुळे आगामी काळात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही भरपाई मिळावी, असा प्रस्ताव पाठवल्याचेही खडसे यांनी सांगितले.