आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेती करावी तर सुप्रिया सुळेंसारखी, सोशल मीडियात उत्पन्नावरून चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार सुप्रिया सुळे (फाईल फोटो) - Divya Marathi
खासदार सुप्रिया सुळे (फाईल फोटो)
मुंबई- शेती व कृषी उत्पन्नावर इनकम टॅक्स लागत नसल्यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी मुंबई व पुणे शहरातील तब्बल 404 जणांनी आपल्याला शेतीतून 1 कोटींहून अधिक रूपयांचे उत्पन्न मिळाल्याचे दाखवल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत सध्या सोशल मिडियात एक मॅसेज फिरत आहे.
2009 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल करताना आपल्याला शेतीतून 52 कोटी रूपयांचे उत्पादन मिळाल्याचे नमूद केले होते. 2014 सालीच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताईंनी हेच उत्पादन 113 कोटी रूपये दाखवले होते. मात्र, आपल्या मालमत्तेत किंवा संपत्तीत वाढ झाली नसल्याचे सांगत रेडीरेकनर दरानुसार आपल्या मालमत्तेची किंमत वाढल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, देशातील, राज्यातील तमाम शेतक-यांची एकीकडे शेती तोट्यात असताना तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना सुप्रियाताईंना केवळ 10 एकरात कोट्यावधीचा नफा कसा होतो असा सवाल उपस्थित केला आहे.
बारामती तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागात आजही लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. अनेक गावांत आजही तेथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. असे असताना सुप्रियाताई सुळेंच्या शेतीला पाणी कोठून मिळते व कोट्यावधीचा नफा मिळविण्यासाठी शेतात त्या नेमकी कोणती पिके घेतात असा प्रश्न सोशल मिडियात फिरत आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून राज्यात दुष्काळ आहे. राज्यातील अनेक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. शेतकरी रोज आत्महत्या करीत असल्याच्या बातम्या पेपरात आपण वाचतो मग अशा परिस्थितीतही खासदार सुप्रिया सुळे यांच्या उत्पन्नात भरमसाठ वाढ कशी काय झाली असा सवाल उपस्थित करीत, शेती करावी तर सुप्रियाताई सुळे यांच्यासारखीच असा मॅसेज सोशल मिडियात फिरत असल्याने राजकीय वर्तूळात चर्चा सुरु झाली आहे.
काय फिरतोय सोशल मीडियात मॅसेज-
शेती करावी तर सुप्रियाताई सुळेसारखी-
''सौ. सुप्रियाताई सुळे बारामती मतदार संघातून निवडणूक लढवतात. त्यांचा मूळ व्यवसाय शेती दाखवलेला आहे. त्यांचेकडे फक्त 10 एकर शेती असूनही त्यांनी यामध्ये तब्बल 113 कोटी रुपये कमावले. याच शेतीमधील उत्पादन 2009 च्या निवडणुकीमध्ये दाखवले होते 52 कोटी रुपये, मात्र 2014 ला ते झालेय तब्बल 113 कोटी म्हणजे 61 कोटी. केवळ 5 वर्षात 10 एकरात कमावले म्हणजे त्या नक्कीच शेतीत काहीतरी जादू करत असणार. महाराष्ट्रात मात्र 20 एकरवाले शेतकरीसुद्धा कर्जबाजारी होवून आत्महत्या करत आहेत. त्या सर्वांना सुप्रियाताईंकडून कमीत कमी जागेत भरघोस नफ्याची शेती कशी करावी हे तंत्र शिकण्याची अतिशय आवश्यकता आहे. त्यावेळी ताईंना हात जोडून एकच विनंती कि तुमच्याकडील शेती एवढी नफ्यात असेल तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर तमाम भारतातील शेतक-यांना या जादूच्या शेतीचे रहस्य, तंत्र किंवा माहिती सांगावी. म्हणजे या देशातील दरिद्री शेतकरी आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतील.”
पुढे वाचा, नेटिझन्स म्हणतात, या पराक्रमाबाबत सुप्रियाताईंना नोबेल किंवा भारतरत्न मिळायला हवा...
सुप्रियाताई सुळे यांच्याप्रमाणेच पुणे- मुंबई शहरात आहेत तब्बल 400 शेतकरी कोट्याधीश...