आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aharashtra Governor K. Shankarnarayan Resign News In Marathi

मिझोराममध्ये बदलीवरून राज्यपाल के. शंकरनारायणन यांचा तडकाफडकी राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मिझोराममध्ये बदली करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी रविवारी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. राज्यघटनेनुसार राज्यपालांची नियुक्ती किंवा बरखास्तीचे राष्ट्रपतींना अधिकार आहेत. घटनेचा सन्मान करणे माझे कर्तव्य असल्याने मी राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे, असे शंकरनारायणन म्हणाले. दरम्यान, गुजरातचे राज्यपाल ओ.पी. कोहली यांना महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

राजीनाम्यानंतर राजभवनातील पत्रकार परिषदेत शंकरनारायणन म्हणाले, मिझोराममध्ये जाणे मला शक्य नाही. सर्वच पक्ष राजकारण करतात. मात्र, राष्ट्रपती राज्यपाल ही पदे राजकारणाच्या कक्षेबाहेरची असतात. राज्यपालपदाच्या काळात मी कधीही राजकारण केले नाही. भाजप-शिवसेनेसह सर्वच पक्षांशी सलोख्याचे संबंध होते. कोणतेही पद कायम नसते. मात्र पदांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. केंद्रातले सरकार कधीतरी बदलेल याची जाणीव असे निर्णय घेताना ठेवावी, असे ते म्हणाले.
यूपीएकाळात नियुक्त ८२ वर्षीय शंकरनारायणन यांना गृह सचिव अनिल गोस्वामी यांनी फोन करून त्यांना राजीनामा मागितला होता.
सुडाचेराजकारण : राज्यपालांनाअशा पद्धतीने हटवले जाणे हे सूडबुद्धीने केले जात आहे का, यावर भाष्य करणे टाळले. मात्र हे सुडाचे राजकारण आहे किंवा नाही हे तुम्हीच ठरवा, असा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिला.
(फोटो: राज्यपाल के. शंकरनारायणन)