आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर, धुळे मनपासाठी 15 डिसेंबरला मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अहमदनगर, धुळे महापालिका, धुळे, नंदुरबार व अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी बुधवारी जाहीर केला. या निवडणुकांसाठी 15 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 16 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

अहमदनगर, धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक व सोलापूर, लातूर महापालिकांतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 ते 26 नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 27 नोव्हेंबर रोजी छाननी होईल. 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. नागपूर जिल्ह्यातील नवनिर्मित चौदा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक तसेच इचलकरंजी, गंगापूर व उस्मानाबाद या तीन नगर परिषदांतील रिक्त पदांकरिता 15 डिसेंबर रोजी मतदान होईल.

एक डिसेंबरला जि.प.साठी मतदान
धुळे, नंदुरबार व अकोला जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या 17 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 11 ते 16 नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. 18 नोव्हेंबर रोजी छाननी होईल. 23 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी ही मुदत 27 नोव्हेंबर असेल. 1 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून 2 डिसेंबरला मतमोजणी होईल.