आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aib Roast Mumbai Court Orders Fir Against Deepika Karan

AIB: अश्लिलतेचा ठपका ठेवत 14 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- यूट्यूब चॅनलवरील ऑल इंडिया ब... ( एआयबी) नॉकआऊट या कार्यक्रमाने अश्लीलतेचा कळस गाठल्याने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 14 जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. वादग्रस्त ‘एआयबी नॉकआऊट’ कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता रणवीर सिंग अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा, दिपीका पदुकोण, आलिया भट्ट यांच्यासह करण जोहरच्या आईवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ऍडव्होकेट आभा सिंग यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी झाली.
यूट्यूबवर एआयबी शो कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या कार्यक्रमात बड्या कलाकारांनी अश्लिलतेचा कळस गाठत शिव्याचा भडीमार केला होता. त्यामुळे चित्रपटसृष्ठीबरोबरच राजकीय व सामाजिक संघटनांनी या शोविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. या वादानंतर हा व्हिडिओ यूट्यूबवरून हटविला गेला आहे. हा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला व त्याला सुमारे 4 हजार लोकांनी हजेरी लावली होती. तसेच यातून 50 रूपयाची कमाई करण्यात आली होती.
मागील वर्षी 20 डिसेंबर रोजी वरळीत हा एआयबीचा शो पार पडला होता. त्यानंतर या कार्यक्रमाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण जोहर याने केले होते. तर रोस्ट म्हणून अभिनेता रणविर सिंग आणि अर्जुन कपूर यांना बोलावले गेले होते. या कार्यक्रमात अश्लील आणि बिभत्सपणे एकमेकांवर टीका करण्यात आली. याप्रकरणी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज ( एफडब्ल्यूआयसीई)ने एनआयबी नॉकआऊट शो मध्ये सहभाग घेतलेल्या रणवीर, अर्जून कपूर आणि करण जौहर यांना माफी मागण्यास सांगितले होते.
या संघटनेने म्हटले होते की, या तिघांनी माफी मागितली नाही तर यातिघांविरोधात कडक कारवाई केली जाईल. त्यावेळी करण जौहर याने ज्यांना हा कार्यक्रम पसंत नाही त्यांनी तो पाहू नये असे सांगत माफी मागण्यास नकार दिला होता. दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यानेही करण जौहरचे समर्थन केले होते.