मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काँग्रेससोबतची आघाडी तोडल्यानंतर पक्षाला स्वबळावर निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. समाजवादी पक्ष व काही समविचारी पक्ष काँग्रेससोबत आघाडी करण्याचा विचार करीत होते. मात्र काँग्रेस हायकमांडने याला विरोध केला. दरम्यान, काँग्रेसने
आपल्या सर्व 288 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत 118 जागांवर तर, दुस-या यादीत 143 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
तिसरी यादी करताना दुस-या यादीतील तीन उमेदवारांना बदलत नव्याने 30 जणांची तिसरी यादी सादर केली आहे. या यादीत अनुभवाच्या बरोबरीने नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली असली तरी उर्वरित उमेदवार फारच कमकुवत दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ख-या अर्थाने कसोटी लागणार आहे.
पुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा काँग्रेसच्या तीन याद्याची 288 जागांवरील यादी एकत्रित पाहा...