आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'MIM\'चे आमदार वारिस पठाण निलंबित, ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - "भारतमाता की जय' म्हणण्यास नकार देणारे 'एमआयएम'चे आमदार वारिस पठाण यांना बुधवारी अधिवेशन संपेपर्यंतच्या काळासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले.
"एमआयएम'चे अध्यक्ष अकबरुद्दीन ओवेसी यांनी संसदेत हीच भूमिका घेतली होती. त्यांचा कित्ता पुढे सुरू ठेवत आमदार पठाण यांनी बुधवारी विधानसभेत "भारतमाता की जय' म्हणणार नाही, असे सांगताच सभागृहात गोंधळ माजला. सर्वपक्षीय आमदारांनी पठाण यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. ही मागणी ठरावाद्वारे सभागृहात मांडण्यात आली. हा ठराव एकमताने मंजूर झाल्याचे घोषित करत वारिस पठाण यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.

पठाण यांना निलंबित करावे या मुद्द्यावर सर्वपक्षीय सदस्य आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, "हा स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान असून पठाण यांनी माफी मागावी. त्यांना त्वरित निलंबित करा', अशी मागणी केली.
या गोंधळातच आणखी दोन वेळा सभागृहाची बैठक तहकूब झाल्यानंतर राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पठाण यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून पठाण यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्षांनी केली.
आशिष शेलार यांनीही हा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगून सभागृहाचा अवमान असल्याचे सांगितले. राष्ट्रप्रेमाची वेळ येते तेव्हा सभागृहातील सर्व सदस्य एकत्र येतात त्याचा परिचय आज आला. ज्या राज्यघटनेवर हात ठेऊन शपथ घेऊन सदस्य सभागृहात येतात त्या घटनेचा हा अनादर आहे. अशा सदस्यांना निलंबित केलेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
असा पेटला वाद...
> राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी राज्यात महापुरुषांची स्मारके उभारण्यापेक्षा त्या पैशातून रुग्णालये बांधा, पक्षाच्या पैशातून स्मारके बांधा असे वक्तव्य केले.

> अभिभाषणात शिवाजी महाराज, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांचा उल्लेख होता.

> यावर शिवसेनेचे गुलाबराव देवकर यांनी आक्षेप घेत "महापुरुषांबद्दल आदर नाही का, भारतमाता की म्हणणार नाही का?' असा प्रश्न केला. यावर वारिस पठाण यांनी तत्काळ उठून आक्षेपार्ह घोषणा दिली आणि वाद पेटला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, हे निलंबन चुकीचेच... भारतमातेचा अपमान होईल असे शब्द नकोच : सत्तार..... देशाचा मान राखा : जाधव...... सारेच आक्रमक...