आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पुण्याजवळ हवाईदलाचे सुखोई विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याजवळ थेऊर परिसरातील कोलवडी गावाच्या हद्दीत आज सायंकाळी पाचच्या सुमारास भारतीय हवाईदलाचे सुखोई विमान कोसळले. यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले आहे.
हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 5 च्या सुमारास हवाई दलाच्या ताफ्यातील सुखोई विमानाने उड्डाण केले होते. प्रशिक्षणाचा भाग म्हणून विमानाचे उड्डाण झाले होते. मात्र थेऊर परिसरात गेल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. विमान कोसळत असल्याचे कळताच वैमानिकांनी पॅरॉशूटच्या मदतीने विमानाच्या बाहेर एक्झिट केली. त्यानंतर थोड्याच वेळात विमानाला मोठी आग लागली. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. Sukhoi-30 MKI हे लढाऊ प्रकारातील विमान आहे.
पुढे पाहा, पुण्याजवळ कोसळलेल्या विमानाची छायाचित्रे....