आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडिया-वैमानिकांत पुन्हा सुरू झाली धुसफूस

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप संपतो न संपतो तोच व्यवस्थापन आणि वैमानिकांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला आहे. एअर इंडियाचे व्यवस्थापन दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नसल्याचा आरोप या वैमानिकांनी केला आहे. त्यामुळे विमानसेवेवर या बाबींचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वैमानिकांच्या ‘इंडियन पायलट्स गिल्ड’ या संघटनेचे सदस्य रोहित कपाही यांनी ही बैठक निष्फळ ठरल्याचे सांगितले. संपात सहभागी झालेल्या 101 वैमानिकांना पुन्हा कामावर घेण्याच्या मुद्दय़ावरून ही बैठक बोलावण्यात आली होती. कामगार आयुक्तदेखील या बैठकीला हजर होते. पण या मुद्दय़ावरून ठोस आश्वासन देण्यास व्यवस्थापनाने असर्मथता दर्शवल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याचे कपाही यांनी या वेळी सांगितले. अधिकृत संघटना म्हणून ‘इंडियन पायलट्स गिल्ड’ला मान्यता देणे व संपात सहभागी झालेल्या 101 वैमानिकांना पुन्हा कामावर घेणे, या वैमानिकांच्या दोन प्रमुख मागण्यांवर विचार करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने या बैठकीत स्पष्ट केले.
एअर इंडियाच्‍या वैमानिकांचा संप अद्याप सुटलेला नाही
एअर इंडियाच्या ११ वैमानिकांचे रविवारपासून आमरण उपोषण
एअर इंडियाकडून नवी वैमानिक भरती, संपक-यांना कायमची कवाडे बंद