मुंबई - डासांच्या उपद्रवामुळे मुंबईवरून कोचीला जाणा-या एअर इंडियाच्या विमानाचे एक तास उशीराने उड्डाण झाले, अशी तक्रार एका प्रवाशाने केली आहे. सोमवारी सकाळी मुंबईवरून कोचीला जाणा-या फ्लाइटबाबत या प्रवाशाने तक्रार केली. प्रवाशाच्या आरोपानंतर उड्डाणाला तासभर उशीर झाल्याचे एअर इंडियाने मान्य केले. मात्र, प्रवाशांना विमान खाली करण्यास सांगितले हा आरोप कंपनीने मान्य केला नाही. विमानात होते डास..
विमानात होते डास...
- एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये एग्झिक्येटिव्ह असलेल्या रामा अय्यर यांनी टीएनएम या वेबसाइटवर माहिती दिली.
- रामा यांचा आरोप आहे की, ते कोचीला जाण्यासाठी सोमवारी सकाळी 5.30 वाजता विमानतळावर पोहोचले.
- त्यांना एअर इंडियाच्या फ्लाइट नंबर एआय-054 मध्ये बसायचे होते.
- रामा यांच्या मतानुसार सर्व प्रवाशी बसले होते. विमानात मोठ्या प्रमाणात डास होते. मात्र, प्रवाशांनी याची तक्रार केली नाही.
- फ्लाइट कॅप्टनने प्रवाशांना सामानाच्या पिशव्या घेऊन विमान खाली करण्याचे सांगितले. जेणेकरून स्प्रेव्दारे डास पळवता येतील.
तरी थांबला नाही डासांचा उपद्रव
- प्रवाशांच्या माहितीनुसार, स्प्रेव्दारे डासांना पळवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, तो अपयशी ठरला. डासांचा उपद्रव थांबता थांबेना.
- त्यांनी सांगितले की, मुंबई विमानतळाजवळून ‘मीठी नदी’ वाहते. त्यामुळे येथे मोठ्याप्रमाणात डास येतात.
- रामा यांच्या माहितीनुसार, 5.30 वाजता सुटणा-या फ्लाइटने 7.10 ला टेकऑफ केले नि ते 8.50 ला कोचीमध्ये पोहचू शकले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो....