मुंबई - एअर इंडियाचे एक विमान शुक्रवारी(ता.एक) छत्रपती शिवाजी विमानतळाच्या एका एअरोब्रिजला धडकले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमान मुंबईहून रियाधकडे निघाले होते. उड्डाणापूर्वी झालेल्या या हल्ल्यात विमानाचे डाव्या पाताचे रोटर ब्लेड्सला नुकसान पोहोचले. अपघातात कोणतीही जीवीत हानी न झाल्याचे वृत्त आहे. एअर इंडियाच्या विमानांचे 24 तासांमध्ये ही दुसरी दुर्घटना आहे. गुरुवारी श्रीनगर विमानतळावरही विमान उतरताना एअर इंडियाच्या विमानाचे टायर फुटले होते. केव्हा व कधी झाला अपघात...
- विमानतळाच्या सूत्रानुसार, हा अपघात विमान उड्डाणाच्या पूर्वी घडला. विमानाला धावपट्टीवर आणले जात होते. तेव्हाच रोटर ब्लेड्स एअरोब्रिजला धडकले.
- या विमानाच्या प्रवाशांना दुस-या विमानाने रियाधला पाठवले जाणार आहे.