आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air India Gives Offer To Pranav Dhanawade, Sf Company Made Bat His Name

प्रणवला \'एअर इंडिया\'ची ऑफर, SF बनविणार त्याच्या नावाची P-1009 बॅट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणव धनावडे (फाईल फोटो) - Divya Marathi
प्रणव धनावडे (फाईल फोटो)
नवी दिल्ली- 15 वर्षीय प्रणव धनावडेने एकाच डावात नाबाद 1009 धावा ठोकल्यानंतर त्याच्यावर कौतूकाचा व बक्षिसांचा वर्षावच होत आहे. सामान्य घरातील कल्याणच्या मराठमोळ्या प्रणवला आता 'एअर इंडिया'ने शिष्यवृत्ती देऊन आपल्या संघात येण्याची ऑफर दिली आहे. प्रणवला आयुष्यभर मोफत क्रिकेट किट पुरविण्याचा निर्णय घेतलेल्या मेरठमधील स्टॅनफोर्ड (SF) कंपनीने आता प्रणवच्या नावाने क्रिकेट बॅट बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. P-1009 या नावाने ही बॅट बाजारात आणली जाईल.
काय आहे एअर इंडियाची ऑफर
- प्रणव धनावडे याने एअर इंडियाची शिष्यवृत्ती स्वीकारावी यासाठी कंपनीने संपर्क साधला.
- प्रणवच्या आई-वडिलांना संपर्क साधून त्याने एअर इंडिया संघात दाखल व्हावे अशी इच्छा कंपनीच्या अधिका-यांनी व्यक्त केली.
- एअर इंडिया क्रीडा क्षेत्रातील होतकरू युवकांना हेरून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती देते.
- गेल्या काही वर्षात एअर इंडियाने अनेक खेळांडूना दत्तक घेतले होते. अनेकांनी देशाचे नेतृत्त्व केले.
- एअर इंडियाने प्रणवला देऊ केलेल्या शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
- प्रणवच्या आई-वडिलांनी विचार करून लवकरच तुमच्याशी संपर्क साधू असे एअर इंडियाच्या अधिका-यांना कळवले आहे.
प्रणववर कौतूकांचा वर्षाव
- प्रणव धनावडे याने विश्वविक्रम रचल्यानंतर त्याच्यावर विविध स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.
- सामान्य कुटुंबातील असल्याने व त्याचा खेळावर, गुणवत्तेवर परिणाम होऊ नये म्हणून राज्य सरकार प्रणवचा शिक्षण व क्रिकेट कोचिंगचा खर्च करणार आहे.
- मुंबई क्रिकेट असोसिएशन(MCA)कडून प्रणवला पुढील 5 वर्षासाठी प्रतिमहिना 10 हजार रूपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा
- ज्या बॅटने खेळत प्रणवने विक्रम रचला त्या SF कंपनीने प्रणवला आयुष्यभर क्रिकेट कीट मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला.
- शिवसेना व मनेसकडून प्रणवला प्रत्येकी 1 लाख रूपये देण्यात येणार आहेत.
- कल्याण-डोंबिवलीकरांकडून प्रणवचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.