आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत विमानाचे टायर फुटले; घसरगुंडीच्या साह्याने प्रवाश्यांनी केली सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नागपूरहून मुंबई विमानतळावर आलेले एअर इंडियाचे विमान उतरून धावपट्टीवर चालत असताना अचानक त्याचे एक टायर फुटले. विमानात 150 प्रवासी होते. सर्व प्रवाशांची आपत्कालीन घसरगुंडीच्या साह्याने सुटका करण्यात आली. हा प्रकार रात्री मंगळवारी 10 वाजता घडला.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, नागपूरहून आलेले एअरबस- 320 हे विमान उतरल्यानंतर एक टायर फुटले. त्यानंतर हे विमान टॅक्सीवेमध्ये नेऊन तेथे आपत्कालीन घसरगुंडीच्या साह्याने प्रवाश्यांची सुटका करण्यात आली. या अपघातात प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर धावपट्टी काही वेळ बंद ठेवण्यात आला होता. परंतु, आता सर्वकाही सुरळीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाले भेदरलेले प्रवाशी?
बातम्या आणखी आहेत...