आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Pollution Remedy Solve For Sweden Appliance At Thane

वायू प्रदूषणावर उपायासाठी ठाण्यात स्वीडनचे उपकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात मुंबई, पुणे, नाशिक नागपुरात सर्वाधिक वायू प्रदूषण असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट झाले. या समस्येवर महापालिका उपाययोजना करत आहेत. ठाणे पालिकेने मात्र हवेतील धूलिकणांचे प्रमाण मोजण्यासाठी स्वीडनच्या तंत्रावर आधारित अत्याधुनिक हवा सर्वेक्षण केंद्र उभारले आहे.

केंद्रीय प्रदूषण मंडळाने दिल्लीत असे उपकरण लावले आहे. परंतु ते राबवणारी ठाणे मनपा राज्यात पहिली ठरली. इतर पालिकांनीही तसे केल्यास वाढत्या प्रदूषणाचा अंदाज घेऊन उपाययोजना शक्य होतील.

ठाण्यात सध्या निवासी, व्यापारी, अाैद्याेिगक भागातील प्रदूषण माेजण्यात येत अाहे. वाढत्या शहरीकरणामुळे अाैद्याेगिक िवभाग कमी हाेत चालला अाहे. ठाण्याची लाेकसंख्या २० लाख असली तरी वाहनांची नोंदणी सुमारे १६ लाख आहे. त्यात दुचाकी नऊ लाख अाहेत. ठाण्यातील तिनहात नाक्याचे वैिशष्ट्य म्हणजे येथे ७२ िदशेने वाहनांची ये-जा हाेते िसग्नलवर वाहनांना िकमान तीन िमनिटे ताटकळावे लागते. वाहनांमुळे वाढत असलेल्या प्रदूषणाची माेजणी करण्यासाठी याच नाक्याची िनवड केली. स्वीडनमधील अाॅफिसेस या कंपनीचे हे अत्याधुिनक उपकरण फेब्रुवारीत ितनहात नाका येथे लावण्यात अाले. हवेतील अाेझाेन, कार्बन, नायट्राेजन या प्रदूषणाच्या प्रत्येक घटकाची दर सेकंदाला नाेंद केली जाते. उपकरणातील सेन्सर्स वातावरणातील अार्द्रता, वाऱ्याचा वेग िदशा, सूर्याची अतिनील किरणे. हवेची गुणवत्ता, दैनंिदन तापमान याचाही मागाेवा घेतात. ही मािहती संगणक प्रणालीत साठवली जाते. त्यामुळे नेमक्या काेणत्या घटकाच्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त अाहे ते कळते.

महापािलकांना फायदा असा
> अाैद्याेगिक प्रदूषणाची ‘रिअल टाइम’ मािहती मिळाल्याने लवकर उपाय करता येऊ शकतील. कचराभूमीवर गॅसची दुर्गंधी असेल तर त्यावर वेळीच िनयंत्रण मिळवणे शक्य होणार.
> प्रदूषणाचे स्वरूप पाहून पीयूसीचे िनयम कडक करणे, वििशष्ट वेळेत प्रदूषण हाेत असल्यास जड वाहनांना बंदी घालणे. प्रदूषणाचा काेणता घटक वाढताेय याचा अचूक अंदाज शक्य.
ठाण्यातील तिनहात नाक्यावर ७२ दिशांनी वाहने येतात. येथे उपकरण बसवले आहे.

वाढती वाहने बांधकामे कारणीभूत
>वाढतीवाहनेबांधकामांमुळे प्रदूषण वाढत अाहे. त्यामुळे प्रदूषण माेजण्याची प्रकर्षाने गरज हाेती. प्रदूषण िनयंत्रण महामंडळाचाही अितप्रदूषित शहरांत अशी उपकरणे लावण्याचा िवचार अाहे. लवकरच हवामान केंद्र परिवहन विभागाशी जाेडण्यात येणार. परिवहन महापािलका यांच्या माध्यमातून प्रदूषण रोखणे शक्य हाेईल. - मनीषा प्रधान, प्रदूषणिनयंत्रण अिधकारी, ठाणे मनपा.