आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AirAsia Offers 5 Lakh Free Tickets On Select Routes

विमान कंपन्यांचा ग्राहकांना पिंगा, ‘एअर एशिया’ देणार 5 लाख तिकिटे मोफत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मलेशियाची एअरलाइन असलेल्या ‘एअर एशिया’ने भारतात आपले पाय घट्ट रोवण्यासाठी व विमानसेवा लोकप्रिय करण्यासाठी सुरुवातीच्या काळात 5 लाख विमान तिकिटे मोफत देण्याची स्पेशल ऑफर दिली आहे. याचबरोबर मलेशियाला जाण्यासाठी कौलालंपूरच्या विशेष मार्गावर कमी किमतीची तब्बल 18 लाख तिकिटे देण्यात येणार आहेत. 1 ऑक्टोबर 2014 ते 30 एप्रिल 2015 या सहा महिन्यांच्या कालावधीदरम्यान ‘एअर आशिया’ने ही विशेष सवलत देऊ केली आहे. या स्पेशल ऑफरच्या बुकिंगला रविवारपासून सुरुवात झाली असून ती 2 मार्चपर्यंत सुरू राहील.
'एअर एशिया' कंपनीने जारी केलेल्या पत्रकानुसार, कोची, कोलकाता, तिरुचिरापल्ली, चेन्नई, बंगळुरू येथून कोलालंपूरचे तिकीट फक्त 6999 रूपये एवढे ठेवले आहे. तर, चेन्नई- बँकॉंक प्रवासासाठी 7999 इतका कमी दराचे तिकीट ठेवण्यात आले आहे.
पुढे वाचा, एअर एशियातर्फे केवळ देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय प्रवासावरही विशेष सवलत...
...इंडिगो, गो एअरची 50 टक्के सवलत