आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Airoli 8 Year Old Franshelas Dead Body Found, Her Uncle Arrested

नवी मुंबई: कौटुंबिक वादातून 8 वर्षाच्या फ्रान्शेलाची काकाकडूनच हत्या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी काका क्लॅरेन्स फॉन्सेकाने मीरा रोड-घोडबंदर येथील सुनशान भागात फ्रान्शेलाचा मृतदेह टाकून दिला होता. - Divya Marathi
आरोपी काका क्लॅरेन्स फॉन्सेकाने मीरा रोड-घोडबंदर येथील सुनशान भागात फ्रान्शेलाचा मृतदेह टाकून दिला होता.
मुंबई- नवी मुंबईतील ऐरोलीमधून अपहरण झालेल्या फ्रान्शेला सोफिया फ्रान्सिस्को वाज या 8 वर्षाच्या मुलीची हत्या झाल्याचे शुक्रवारी सकाळी स्पष्ट झाले. फ्रान्शेलाची हत्या तिच्या काकानेच म्हणजे मावशीच्या नव-याने केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. क्लॅरेन्स असे त्याचे नाव असून त्याने कृत्याची कबुली दिली आहे. कौटुंबिक वादातून फ्रान्शेलाचे अपहरण करुन तिची गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. फ्रान्शेलाचा मृतदेह आज सकाळी मीरारोड-घोडबंदर परिसरात सापडला. फ्रान्शेलाच्या हत्येप्रकरणी क्लॅरेन्सला अटक केली आहे.

सोमवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून फ्रान्शेला राहत असलेल्या सोसायटीच्या गेटवरून तिचे अपहरण झाले होते. स्कूल बसमधून ती सोसायटीच्या बाहेर उतरली होती. त्याचवेळी तेथे एक लाल रंगाची कार थांबली होती. आत बसलेल्या व्यक्तीने फ्रान्शेलाला बोलवून घेतले. त्यावेळी फ्रान्शेला गाडीतील व्यक्तीशी नीटपणे बोलत होती, असे तेथे उपस्थित प्रत्यक्षदर्शी लोकांनी नंतर सांगितले होते. त्यामुळे ते लोक ओळखीचे असावेत असा संशय पोलिस व फ्रान्शेलाच्या आईला होता. फ्रान्शेलाचे वडील परदेशात नोकरी करतात. फ्रान्शेलाच्या घरी एका मोलकरणीला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे तिच्यावर संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवली असता फारसे काही हाती लागत नव्हते.
अखेर अपहरण झाल्याच्या सायंकाळी एक व्यक्ती दोन मिनिटांसाठीच फ्रान्शेलाच्या घरी आल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला. मात्र, तो फ्रान्शेलाच्या मावशीचा नवरा असल्याचे तिच्या आईने सांगितले. त्याच्यावर संशय व्यक्त केला नाही. मात्र, पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो घोडबंदर या सुनशान भागात त्याच सायंकाळी तासाभराने गेल्याचे समोर आले. दरम्यान पोलिस इतर बाबी पडताळून पाहत होते. अखेर दोन दिवसांनी पोलिसांनी तिचे काक क्लॅरेन्सला चौकशीसाठी ताब्यात घेतले. घोडबंदर परिसरात कशाला गेला होता व फ्रान्शेलाच्या घरी त्याच सायंकाळी दोन मिनिटांसाठी कशाला आला होता?असा सवाल पोलिसांनी त्याला विचारला. यात तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने फ्रान्शेलाची कौटुंबिक वादातून हत्या केल्याचे कबुली दिली. क्लॅरेन्सने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांना मीरा रोड-घोडबंदर परिसरातून फ्रान्शेलाचा मृतदेह मिळाला. त्यावेळी तिच्या शरीरावर जखमा आढळल्या. तसेच तिचा मृत्यू गळा दाबून सोमवारी सायंकाळीच झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिस अजूनही विविध अँगलने या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

वाचा, या अपहरणाचा घटनाक्रम
- फ्रान्शेला न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये तिसरीत शिकत होती.
- फ्रान्शेला सोमवारी नेहमीप्रमाणेच सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान स्कूल बसमधून
ऐरोलीतील सेक्टर 8 मधील आपल्या 'एकवीरा दर्शन सोसायटी'जवळ उतरली.
- त्याचवेळी लाल रंगाची कार तेथे थांबली होती. कारमधील व्यक्तीला ती बोलत कारमध्ये बसली.
- सायंकाळी सातपर्यंत फ्रान्शेला सातपर्यंत न आल्याने तिच्या आईने चौकशी सुरु केली.
- त्याचवेळी शेजारीच राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाने फ्रान्शेलाला कोणीतरी लाल कारमधून घेऊन गेल्याचे सांगितले.
- फ्रान्शेलाचे कुटुंबिय आणि क्लॅरेन्स यांच्यात वाद होते. त्यामुळे क्लॅरेन्सने तिचे अपहरण केले. त्यानंतर तासाभरातच तिची गळा दाबून हत्या करुन मृतदेह मीरारोड-घोडबंदर रोड इथे टाकला.
- हादरलेल्या फ्रान्शेलाच्या आईने थेट पोलिस स्टेशन गाठून अपहरणाची तक्रार दाखल केली.
- तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडिल परदेशातून मुंबईत दाखल झाले आहेत
- फ्रान्शेलाच्या मृतदेहावर अनेक जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर बलात्कार झाला आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत.
- या प्रकरणात मावशीचा पती क्लॅरेन्सला अटक केली आहे. पोलिसांना या नराधमावर आधीपासूनच संशय होता, मात्र काल रात्री त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच फ्रान्शेलाची हत्या केल्याची जागाही त्याने पोलिसांना दाखवली.

- पोलिसांना आज सकाळी फ्रान्शेलाचा मृतदेह सापडला. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुढे पाहा, फ्रान्शेलाची छायाचित्रे...