आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल करणार 7 हजार कोटी रुपये दान; स्थापन करणार विद्यापीठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल म्हणाले की, आम्ही हे काम व्यवसायासाठी करत नाही. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल म्हणाले की, आम्ही हे काम व्यवसायासाठी करत नाही. (संग्रहित फोटो)

मुंबई- ‘एअरटेल’ कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी आपल्या एकूण संपत्तीतील 10 टक्के भाग म्हणजे तब्बल 7 हजार कोटी रुपये सामाजिक कामांसाठी दान करण्याची घोषणा केली आहे. भारती फाऊंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कामे करणार आहेत.

 

विश्वविद्यापीठ स्थापन करणार

त्याचसोबत, दुर्बल आणि वंचित समाज घटकांमधील तरुण-तरुणींना मोफत शिक्षण घेता यावं म्हणून ‘सत्य भारती विश्वविद्यापीठ’ स्थापन करण्याची घोषणाही सुनील मित्तल यांनी केली आहे. हे विश्वविद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी वाहिलेले असेल. उत्तर भारतात सत्य भारती विश्वविद्यापीठ स्थापन केले जाईल. 2021 साली विश्वविद्यापीठ सुरु करण्याचा मानस मित्तल यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 

विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विशेष लक्ष

सत्य भारती विश्वविद्यापीठत विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजातील वंचित विद्यार्थ्यांना इथे मोफत शिक्षण देण्याची सुविधा करण्यात येणार आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...