आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Says Required Information On Panama Papers Being Given To Government

‘पनामा’ प्रकरण: आपण आवश्यक ती माहिती सरकारला दिली: ऐश्वर्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पनामा दस्तएेवजात अापले नाव अाल्याप्रकरणी आपण आवश्यक ती माहिती सरकारला दिली असल्याचे अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन हिने मंगळवारी म्हटले आहे. कर चुकवण्यासाठी परदेशी कंपनीत अनेक बलाढ्य लोकांनी गुंतवणूक केल्याचा खुलासा पनामा पेपर्समधून करण्यात आला होता. यात अभिनेत्री ऐश्वर्यासह अमिताभ बच्चन आणि जगभरातील अनेक दिग्गजांचे नाव पुढे आले होते. दरम्यान, मंगळवारी ऐश्वर्या मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाली तेव्हा पत्रकारांनी तिला या प्रकरणावरून घेरले. त्यावर ऐश्वर्या म्हणाली, या प्रकरणी मी आणि माझ्या कुटुंबीयांनी आधी जारी केलेले पत्रक सत्य असून याची माहिती माध्यमांनाही दिली होती. दरम्यान, सरकारकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची इत्थंभूत माहिती त्यांना देण्यात आली असल्याचेही तिने सांगितले. पनामा प्रकरण उघडकीस अाल्यानंतर अमिताभने आपले नाव उगाच गोवण्यात आल्याचे म्हटले होते. तर, या प्रकरणात ऐश्वर्याचा कोणत्याही प्रकारे सहभाग नसल्याचा त्याच्या प्रवक्त्याने म्हटले होते.