आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajay Devgan Commented On Narendra Dabholkar\'s Murder

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'विचार भलेही पटत नसतील, पण ऊठसूट हिंसेचा मार्ग अयोग्य\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आशयाच्या विविध चित्रपटांतून भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणने विचार व्यक्त केले. दै. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तरुणांची आंदोलने आणि राजकीय व सामाजिक परिस्थितीवर अजयने मांडलेले विचार त्याच्याच शब्दांत...

समाजाला हितकारक नसल्याचे वाटत असल्याने एखादी व्यक्ती एखाद्या विचाराविरुद्ध आंदोलन करत असते. कारण तो विचार तिला पटत नसतो. पण याचा अर्थ असा नाही की ऊठसूट हिंसेचा मार्ग अवलंबला पाहिजे. डॉ. दाभोलकर यांच्याबाबतीत हेच झाले. प्रत्येकाचे विचार सारखेच असतील असे नाही. विचारांचा प्रतिकार विचारानेच करणे योग्य ठरेल.

आंदोलने गांधीजींच्या काळापासूनच
सध्या आंदोलने वाढली आहेत. याचा अर्थ ती आजच होताहेत असे नाही. गांधीजींच्या काळापासून आंदोलने होत आहेत. गुन्हेगारी मात्र वाढते आहे. हिंसा वाईट असते हे ठाऊक असताना तिची बाजू घेतली जाते.

अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...


शब्दांकन : चंद्रकांत शिंदे