आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना 10 हजारांची मदत; अटींमध्ये ताबडतोब बदल करा, \'सुकाणू\'चे समन्वयक नवलेंची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना १० हजारांची तातडीची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, शासन आदेशात हे पैसे मिळवण्यासाठी अनेक अटी लादण्यात आल्या आहेत. सदरच्या अटींमुळे बहुतांश गरजू व संकटग्रस्त शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार असून खूपच थोड्या लोकांना ही मदत मिळेल. हे लक्षात घेऊन या अटींमध्ये ताबडतोब बदल करा, अशी मागणी शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले यांनी शुक्रवारी केली आहे.

सरकारच्या आदेशात १० हजारांच्या मदतीसाठी ३० जून २०१६ रोजी थकीत असलेल्यांनाच पात्र ठरवले आहे. प्रत्यक्षात ३१ मार्च २०१७ रोजीपर्यंत जे शेतकरी कर्जफेड करू शकलेले नाहीत व त्यामुळे नवे पीक कर्ज घेऊ शकलेले नाहीत, अशा सर्वांनाच तातडीच्या कर्जाची नितांत आवश्यकता आहे. मात्र, सरकार वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे, याकडे नवलेंनी लक्ष वेधले आहे.    
 
आदेशानुसार शासकीय नोकरीत किंवा अनुदानित संस्थेत नोकरीला असणाऱ्या मदतीसाठी अपात्र ठरवले आहे. ग्रामीण भागात अजूनही खाते फुटले नसल्याने अनेक भावांची नावे एकाच उताऱ्यावर व रेशन कार्डवर एकत्रच असतात. मात्र, त्यांचे व्यवहार वेगवेगळे असतात. बऱ्याचदा जमीन वहिवाटही वेगवेगळा असतो. मात्र उतारा संयुक्त असतो. अशा परिस्थितीत त्यापैकी एखादा नोकरीला असेल तर उताऱ्यांवरील सर्वच भावांना या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. याचबरोबर कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावे जरी चार चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबाला कर्जासाठी अपात्र ठरवण्यात आल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...