आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे नवे पाेलिस महानिरीक्षक अजित पाटील, १० अायपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुण्याच्या अार्थिक गुन्हे विभागाचे पाेलिस उपमहानिरीक्षक अजित पाटील यांना आैरंगाबादच्या विशेष पाेलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. सध्या या पदावर असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांची कोल्हापूरच्या विशेष पाेलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यातील दहा अायपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सिंधुदुर्ग पाेलिस अधीक्षक असलेल्या सुनील फुलारी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. आंदोलन करणाऱ्या आमदार वैभव नाईक व नितेश राणे यांच्यावर मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांची अाता पुणे येथील राज्य राखीव पाेलिस दलाच्या समादेशकपदी बदली करण्यात आली आहे.

उपमहानिरीक्षक पुणे (अार्थिक गुन्हे विभाग) अजित पाटील यांची विशेष पोलिस महानिरीक्षक, अाैरंगाबाद या पदावर बदली करण्यात आली. राज्य सुरक्षा विभागाचे संचालक कैसर खलिद यांची विशेष मिहानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण पदावर नेमणुक करण्यात आली. औरंगाबादचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची याच पदावर कोल्हापुरात बदली करण्यात आली. तर बदलीच्या प्रतिक्षेत असलेले अमोल गावकर यांना संिध्ुदुर्गचे पाेलिस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. जी.एम.पाटील (अतिरिक्त अधीक्षक नगर), सुनील फुलारी (समादेशक, एसअारपी पुणे), निर्मला देवी (पाेलिसअधीक्षक नागपूर), महेश घुर्ये (समादेशक, एसअारपी, मुंबई), भारत तांगडे (समादेशक, एसअारपी जालना), पंजाबराव उगले (पाेलिस अधीक्षक, एसीबी नाशिक) यांचाही बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. कंसातील पदे त्यांच्या नव्या नियुक्तीची ठिकाणे आहेत.
बातम्या आणखी आहेत...