आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajit Pawar And Tatakare Inquiry On Irrigation News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार, तटकरेंची सिंचनप्रकरणी चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची सिंचनप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याने शशनिवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सिंचनातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराने बदनाम झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार तसेच सुनील तटकरे सिंचन प्रकरणात आधीच अडचणीत आले होते. आता या चौकशीच्या नव्या शुक्लकाष्टाने दोघांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
गृह विभागाने चौकशीसाठी ११ सप्टेंबरला यासंबंधीची फाइल पुढे नेण्यासाठी परवानगी दिली होती. शशनिवारी गृह विभागाने चौकशीला परवानगी दिली. मुख्य सचिवांकडून आता फाइल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली आहे. सिंचन प्रकरणात आता अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह इतर संबंधितांच्या चौकाशीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या परवानगीची आवश्यकता आहे.
मुख्यमंत्र्यांच्याकोर्टात चेंडू :
सिंचनप्रकरणीचौकशीसाठी आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू गेला आहे. त्यांनी परवानगी दिली तरच चौकशी होऊ शकेल. मात्र, निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री अशी परवानगी देतील, याची खात्री वाटत नाही. आघाडी म्हणून याचा राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसलाही फटका बसू शकेल, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
...हीतर रुटीन चौकशी :
सिंचनातराष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यानंतर आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या प्रकरणात चितळे समितीनेही निर्दोष ठरवले आहे. श्वेतपत्रिकेचा सतत आग्रह धरल्याने तीसुद्धा काढून झाली. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आता जर पुन्हा चौकशी होणार असेल तर खरे सत्य पुन्हा एकदा लोकांना कळून दे. ही रुटीन चौकशी आहे, असे आम्हाला वाटते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका नेत्याने व्यक्त केली.