आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गिरीश महाजनांकडे बिबट्या मारण्याचे लायसन्स अाहे काय; अजित पवार यांचा मंत्र्यांना प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील वरखेडेमध्ये नरभक्षक बिबट्याला मारण्याचे अादेश सरकारने दिले अाहेत. त्याच वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन स्वत:च्या संरक्षणाला दिलेली बंदूक घेऊन बिबट्याला मारायला बाहेर पडल्याचा व्हिडिअाे प्रसारित झाला अाहे.  महाजन यांना नेमके झालंय तरी काय? जिथे तिथे ते बंदूक मिरवत असतात. तुम्हाला बिबट्या मारण्याचा परवाना देण्यात अाल अाहे का?  तुम्ही कायदा कसा हातात घेता? असा खाेचक प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बाेलताना उपस्थित केला.    


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भाजप सरकारविराेधात हल्लाबाेल माेर्चाचे अायाेजन पुण्यातील अलका टाॅकीज चाैक या ठिकाणी करण्यात अाले, त्या वेळी ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, मुंबर्इ विद्यापीठात वेळेवर निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले अाहे. याप्रकरणी मुंबर्इ विद्यापीठाचे कुलगुरू, अायटी विभाग प्रमुख विजय गाैतम यासारख्या अधिकाऱ्यांना पदावरून बाजूला करण्यात अाले अाहे. मात्र, केवळ अधिकाऱ्यांना दूर करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी संबंधित शिक्षणमंत्री,कृषी - सहकारी मंत्र्यावर अद्याप कारवार्इ का केलेली नाही. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिलेले माजी अामदार दिलीप माने यांच्यावरील बलात्काराच्या अाराेपाची चाैकशी करून शहानिशा व्हावी. यामागे काेणते राजकारण नाही ना, काेणी बिनबुडाचे अाराेप करत नाही ना, बदनामी करण्याचा डाव यामागे नाही ना, या गाेष्टींचीही तपासणी केली पाहिजे. अण्णाभाऊ साठे महामंडळ घाेटाळ्यात अजित पवार तुुरुंगाची हवा खातील, असे म्हणणारे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लवकरच कारागृहाबाहेर येतील असे नुकतेच म्हणाले हाेते. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, ‘याबाबत कांबळे यांनाच विचारा, मी त्यांना महत्त्व देत नाही.’

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या हल्लाबोल आंदोलनाचे फोटो....

बातम्या आणखी आहेत...