आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार यांनी कुठलेही कार्ड वापरले तरी त्याचा काहीही उपयोग नाही- मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - माझ्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा अजित पवार यांनी कुठलेही कार्ड वापरले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. धनंजय तर कार्ड नसून केवळ सोंगटी आहे. कुठल्याही निवडणुकीत पुतण्या धनंजय यांचे उपद्रवमूल्य आपल्याला त्रासदायक ठरणार नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी दिले.
आपल्याला बीड जिल्ह्यातच अडकवून ठेवण्याची व्यूहरचना आखणा-यांना चार-पाच बैठका होऊनही उमेदवार मिळत नाही, अशा शब्दांत मुंडे यांनी राष्‍ट्रवादी कॉँग्रेस व अजित पवारांना पत्रकार परिषदेत लक्ष्य केले. ते म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनात अगदी सुरुवातीपासूनच मराठा, ओबीसी समाजाचा कायमच पाठिंबा मिळत राहिला आहे. तसे नसते तर लोकसभा निवडणुकीत मी मताधिक्याच्या बाबतीत पहिल्या पाचांत आलो नसतो. त्यामुळे माझ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलेही कार्ड वापरले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

मी उपमुख्यमंत्री असताना बीड जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये जितक्या जागा जिंकता आल्या नव्हत्या, त्याहून अधिक जागा धनंजय व त्यांच्या वडिलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपने मिळवल्या आहेत. मागील निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांमुळे युतीला पन्नास जागा गमवाव्या लागल्या. त्याची दखल आगामी निवडणुकीत घेण्यात येईल, असेही मुंडे यांनी या वेळी सांगितले.