आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अजित पवारांचे स्पष्टीकरण अद्याप पाहिलेच नाही’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आचारसंहिता भंगप्रकरणी नोटीस बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण पाठविले आहे. मात्र त्याला आठवडा उलटला तरी अद्याप निवडणूक आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण यांनी ते पाहिलेले नसल्याची कबुली खुद्द त्यांनीच सोमवारी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 20 पानी स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. ‘पुण्यातील हा कार्यक्रम सर्वपक्षीय आणि पूर्वनियोजित होता. या कार्यक्रमाला आपण लाल दिव्याची गाडी वापरली नव्हती. आचारसंहिता लागू होण्यामध्ये आणि कार्यक्रमाच्या वेळेमध्ये फारसे अंतरही नव्हते. मात्र यापुढे दक्षता घेईनए’ असे पवार यांनी त्यात म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीच्या कामासाठी राज्यभर फिरत आल्याने अद्याप आपण हे स्पष्टीकरण पाहिले नसल्याचे सत्यनारायण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, शिवसेना गटनेते अनिल देसाई यांनी आयोगाकडे जाऊन शिवशक्ती-भीमशक्ती युतीबाबत प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या एका गाण्याची परवानगी घेतली. प्रचारात आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून त्यांनी ही काळजी घेतली.