आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ शिंदेंनी काँग्रेसकडे मंत्रिपद मागितले? नाव न घेता पवारांचा गौप्यस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याणमध्ये मुलाला उमेदवारी दिलेल्या आमदाराने काँग्रेसच्या वरिष्ठांकडे मंत्रिपदाची मागणी केली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला. अजित पवार रविवारी ठाण्यात संजीव नाईक व आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी हा दावा केला. शिवसेनेचे ठाण्यातील नेते व आमदार एकनाथ शिंदे यांच्याच मुलाला शिवसेनेने कल्याणमधून उमेदवारी दिली आहे. हे उघड असल्यामुळे शिंदे यांचे नाव न घेता अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे शिवसेनेच्या वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे. तसेच याचे राजकीय पडसादही उमटण्याची दाट शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंनी मागील काही दिवसात शरद पवारांवर हल्ला चढविला आहे. तसेच राष्ट्रवादी हा गद्दारांचा पक्ष आहे असे जाहीर संभात काही वेळा म्हटले आहे. त्यामुळे अजित पवारांनी शिवसेना व त्या पक्षाच्या नेतृत्त्वावर हल्ला चढविला. पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना नेतृत्त्वावर विश्वास राहिला नसल्याने 8 ते 9 खासदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. त्यातील पाच जणांनी शिवसेना सोडली आहे. उर्वरित खासदारांना पुन्हा उमेदवारी दिल्याने ते सध्या शांत आहेत. शिवसेना नेतृत्त्व खंभीर नसल्यानेच हे घडत आहे. बाळासाहेबांचा पेटून उठणारा शिवसैनिक कुचकामी नेतृत्त्वामुळे हवालदिल झाला आहे.
पुढे वाचा, शिवसेना व शिंदेंची अद्याप प्रतिक्रिया नाही...