मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्यात आलेल्या शासकीय 'देवगिरी' बंगल्याच्या दुरुस्तीवर झालेला खर्च ते स्वत:च्या पैशाने करणार आहेत. सरकारने केलेला देवगिरीच्या देखभालीसाठी सुमारे 27 लाखांचा खर्च केला होता. आता तो खर्च परत करण्यासाठी पवारांनी बांधकाम विभागाला 27 लाखांचा चेक दिला आहे. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यावधी रूपयांचा चुराडा झाल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली होती. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह 11 मंत्र्यांनी विमानप्रवास व आपल्या शासकीय बंगल्याच्या दुरुस्तीसाठी कोट्वधी रूपये खर्च केले होते. याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या बंगल्यावर जर अनावश्यक खर्च झाला असेल तर तो माझ्या वैयक्तिक पैशातून भरपाई देऊ, असे सांगितले होते. त्यानुसार, आज दुस-या दिवशी उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या वैयक्तिक खात्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 27 लाखांचा चेक देऊन टाकला. पवारांच्या 'देवगिरी' बंगल्यावर एका वर्षात 37 लाख 98 हजार रुपयांचा खर्च झाल्याचे माहिती अधिकारात पुढे आले होते.
पुढे वाचा, सरकारी बंगल्यावर किती खर्च केला महाराष्ट्रातील मंत्र्यांनी...