आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरीविराेधी सरकारमुळेच पाेलिसांत गाेळीबाराचे धाडस; अजित पवार यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची अजित यांनी भेट घेऊन त्यांची चौकशी केली. - Divya Marathi
शेवगाव येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची अजित यांनी भेट घेऊन त्यांची चौकशी केली.

शेवगाव- ‘अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याची ताकद पोलिसांमध्ये कोठून आली?’, असा संतप्त सवाल करून ‘सध्याचे सरकार शेतकरीविरोधी असल्यानेच पाेलिसांचे हे धाडस झाले,’ असा अाराेप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केले.  जखमी शेतकऱ्यांवीरल उपचारांचा खर्चही आपणच करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.  


ऊसदराच्या मागणीसाठी बुधवारी शेवगाव तालुक्यातील घोटन व खानापूरच्या शेतकऱ्यांवर पाेलिसांनी लाठीमार केला हाेता, हवेत गाेळीबारही करण्यात अाला हाेता. यात दाेन शेतकरी गंभीर जखमी झाले हाेते. या शेतकऱ्यांनी अजित पवार यांनी गुरुवारी नगरच्या रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यानंतर घोटण येथील ग्रामस्थांशीही संवाद साधला. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘सध्या राज्यातील शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. ते आर्थिक संकटात असताना ऊस दरवाढीसाठी केलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना गोळीबार केला, त्यांच्या निलंबनाची मागणी आपण विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात करणार आहोत. आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू’, असेही त्यांनी सांगितले.  

 

पुढे स्लाईडद्वारे व्हिडिओतून पाहा, शेतक-यांची विचारपूस करताना अजित पवार....

बातम्या आणखी आहेत...