आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Meet Tonight Parties Senior Leader At New Delhi

जागावाटपात नमते घेऊ नका हे पक्षश्रेष्ठींना सांगण्यासाठी अजित पवार दिल्लीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: अजित पवार)
मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्षश्रेष्ठींत एकमत झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार आपले म्हणणे पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोचविण्यासाठी आज दिल्लीला जात आहेत. दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे ते उत्तमच आहे पण राष्ट्रवादी पक्ष 135 पेक्षा एकही जागा कमी घेणार नसल्याची भूमिका अजित पवारांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. आपले म्हणणे सांगण्यासाठी ते पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, डी पी त्रिपाठी व तारिक अन्वर यांना भेटून जागावाटपात नमते घेऊ नका, अशी विनंती करणार असल्याचे कळते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यात आगामी विधानसभा निवडणूक मागील सूत्रांनुसार एकत्रच लढण्यावर एकमत झाले.
तसेच जागावाटप पुढील आठवड्याभरात सुरु होईल असे शरद पवारांनी सांगितले आहे. मात्र, जागावाटप संख्येबाबत भाष्य केले नाही. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीला 10-11 जागा वाढवून देऊ शकते, असे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीला फार फार 125 जागा काँग्रेस सोडू शकते. असे असले तरी अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीला किमान 144 जागा देण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास आम्ही मोकळे आहोत अशी जाहीर भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. त्यावर पक्षाध्यक्ष पवारांनी मी पक्षाचा अध्यक्ष आहे, काय करायचे ते मी ठरवेन असे सांगत समन्वयाची भूमिका घेतली होती. मात्र, काल पवार-सोनिया भेटीत झालेल्या चर्चेनुसार, काँग्रेस राष्ट्रवादीला 125 पर्यंत जागा देऊ शकते, असे सूत्रांकडून कळत आहे. मात्र, अजित पवार कोणत्याही स्थितीत माघार घेण्याच्या स्थितीत नाहीत.
पुढे वाचा, अजित पवार पक्षश्रेष्ठींना नेमके काय सांगणार आहेत...