Home | Maharashtra | Mumbai | ajit pawar on cm and aniket kotale murder case

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाहीच; अजित पवारांची माहिती

विशेष प्रतिनिधी | Update - Nov 15, 2017, 02:39 AM IST

एकीकडे सरकावर टीका करत राहायचे आणि दुसरीकडे अापल्याच पक्षातील नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र

 • ajit pawar on cm and aniket kotale murder case
  मुंबई- एकीकडे सरकावर टीका करत राहायचे आणि दुसरीकडे अापल्याच पक्षातील नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवायचे यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेवर नेहमी प्रश्नचिन्ह उभे केले जात अाहे. ‘मुख्यमंत्र्यांचा मित्रपक्ष’ अशी जनतेत राष्ट्रवादीबाबत भावना निर्माण हाेत अाहे. ही भावना अाणखी वाढू नये म्हणून आता २०१९ च्या निवडणुका हाेईपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्र्यांना न बोलावण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत ही घोषणा केली. तसेच सरकारच्या कारभाराविराेधात जनतेला जागरूक करण्यासाठी एक डिसेंबरपासून विदर्भात पदयात्रा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

  राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांसोबत आमचे भांडण नाही, कार्यक्रमात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जाणे ही आपली संस्कृती आहे, मात्र त्यांना कार्यक्रमांना बाेलावल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतात. यापूर्वी पक्षाच्या काही नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलावले होते. त्याबाबत लाेकांकडून विचारणा व्हायची. म्हणून आम्ही २०१९ च्या निवडणुका हाेईपर्यंत मुख्यमंत्र्यांना सत्कार कार्यक्रमांत न बाेलावण्याचा निर्णय घेतला अाहे.’ ‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचेही हाल होत आहेत. याविरोधात आम्ही २५ नोव्हेंबरपासून हल्लाबोल आंदोलन सुरू करणार आहोत. या आंदोलनानंतर एक डिसेंबरपासून यवतमाळ येथून पदयात्रा सुरू केली जाईल आणि शेतकरी आणि त्रस्त नागरिकांची दिंडी काढण्यात येईल,’ असेही पवार यांनी सांगितले. कर्जमाफी, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, बेरोजगारी आणि विविध आघाड्यांवर सरकारला अपयश आले असल्यानेच सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वेळी सांगितले.
  जनतेने पाहावे काेणाकडे?
  सांगली येथे पोलिसांच्या मारहाणीत अनिकेत कोथळेचा झालेला मृत्यू सरकारसाठी अतिशय लाजिरवाणा आहे. सरकारला पोलिसांवर अंकुश ठेवता येत नसेल तर जनतेने कोणाकडे पाहायचे? या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत पोहोचतात? एवढ्या टोकाला पोलिस कसे पोहोचू शकतात? आपण कोणतेही प्रकरण दाबू शकतो, असा गर्व पोलिसांना झाला आहे, त्याला दाबले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.
  पुढील स्‍लाईडवर पाहा, नागपूर अधिवेशनावर काँग्रेसचा मोर्चा धडकणार...
 • ajit pawar on cm and aniket kotale murder case
  नागपूर अधिवेशनावर काँग्रेसचा मोर्चा धडकणार
  नागपूर अधिवेशनावर काँग्रेसचा मोर्चा धडकणार
   
  मुंबई- राज्यातील काँग्रेसने ११ डिसेंबरपासून नागपूर येथे होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर दोन लाख कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. त्यासंदर्भातील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याची मंगळवारी मुंबईत बैठक पार पडली. नांदेड वाघाळा महापालिकेत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे राज्यातील काँग्रेस त्या पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने हिवाळी अधिवेशनावर विशाल मोर्चा काढण्याचे नियोजन आहे. काँग्रेसच्या या मोर्चात मुख्यत्वे शेतकरी असणार आहेत. फडणवीस राज्य सरकारविरोधात ग्रामीण भागात वातावरण निर्माण व्हावे यासाठी काँग्रेसच्या वतीने दोन शेतकरी दिंडी काढण्यात येणार आहेत. यातील पहिली दिंडी विदर्भातून गडचिरोली ते अमरावती अशी निघणार आहे. दुसरी मराठवाड्यातील औरंगाबाद येथून निघेल आणि अमरावती येथे पोहोचेल. या दोन्ही शेतकरी दिंड्या नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर धडकतील.शेतकरी दिंड्यांची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, या दिंड्या २५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान सुरू होतील, अशी माहिती  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली. 
 • ajit pawar on cm and aniket kotale murder case

Trending