आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशनात चर्चेचे गुऱ्हाळ नकाेच, अारक्षणाची अंमलबजावणी करा, अजित पवार यांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची आवश्यकता नाही. आघाडी सरकारने यापूर्वीच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी करावी, इतकेच काम आहे’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी भवनमध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी मराठा समाजाला आता आरक्षण िमळालेच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका मांडली. राज्यात मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. त्यांच्या मागण्याही रीतसर आहेत. त्याची निवेदनेही दिलेली आहेत. अशा वेळी अधिवेशन बोलावून चर्चेचे गुऱ्हाळ कशाला? असा प्रश्न उपस्थित करताना आता सरकारने थेट आरक्षण जाहीर करायला हवे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

मराठा समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. आरक्षण मिळावे ही त्यांची भावना आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. असे असताना िवशेष अधिवेशन बोलवून चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. हे मोर्चे कोणत्या पक्षाचे नाहीत. त्यात सर्व पक्षांचे लोक सहभागी झाले आहेत. याचा विचार सरकारने करावा. न्यायालयात आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडावी. राणे समितीच्या अहवालात काही त्रुटी असतील तर त्या दूर कराव्यात, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

सामनाच्या संपादकांनी माफी मागावी : मराठा समाजाच्या मूक मोर्चांना मुका मोर्चा असा िशवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून उल्लेख करणे हा समस्त मराठा समाजाचा अपमान असून ही एकप्रकारची ठरवून केलेली मस्करी आहे. या प्रकरणात व्यंगचित्रकाराला बळीचा बकरा केले जात आहे. खरे तर मुखपत्राच्या संपादकांनी पुढे येऊन मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चात ‘राष्ट्रवादी’ही
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाचा नाशिक येथे ३ आॅक्टोबर रोजी मोर्चा निघणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होतील. यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड हे नेते या मोर्चात सहभागी होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अर्धवट बैठक साेडून शरद पवार िदल्लीला
राष्ट्रवादी काँग्रेसची महिन्याची बैठक गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू असताना पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक िदल्लीला बोलावण्यात आली हाेती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पवार पक्षाची बैठक अर्धवट सोडून िदल्लीकडे रवाना झाले.
पुढील स्लाइडमध्ये,
बारामती: कोपर्डी अत्याचाराविराेधात ‘मूक क्रांती’
बातम्या आणखी आहेत...