आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा असू शकतो? : अजित पवार यांचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - “बोगस डिग्रीवाला राज्याचा शिक्षण विभाग कसा सांभाळतो. राज्यात अनेक  उच्चशिक्षित लोक आहेत. स्वत: मुख्यमंत्री उच्चशिक्षित आहेत. त्यांनी या विभागाची जबाबदारी घ्यावी. पण एकूणच शिक्षण क्षेत्राकडे या सरकारचे लक्ष नसल्याचे दिसते,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव न घेता केली. 
 
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वार्षिक सभेत आदर्श विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव पवारांच्या हस्ते सोमवारी पुण्यात करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते. खासदार वंदना चव्हाण यांच्यासह शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.  पवार म्हणाले, राज्यकर्त्यांमधील काही लोक खासगीत बोलताना सगळ्या शिक्षण संस्थाचालकांना दरोडेखोर आणि शिक्षकांना चोर म्हणतात. पाचही बोटे सारखी नसतात हे आम्हालाही समजते. 
 
बाबा राम रहीम आणि सोवळे  
‘सोवळ्यावरून त्रास दिल्याची घटना मध्यंतरी पुण्यात घडली. हे ऐकल्यावर मी कपाळालाच हात लावला. आपण सगळीच हाडामांसाची माणसे आहोत. जातीपाती डोक्यातून काढून टाकल्या पाहिजेत,’ असे अजित पवारांनी सांगितले. बाबा राम रहीम का कोण? त्याने लोकांना फसवले. मुळात राम, रहीम बाबा असली सगळी नावे एकत्र आली की तो बोगसच असतो हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. श्रद्धा, भावनांचा खेळ करणाऱ्यांकडून स्वत:ची फसवणूक होऊ नये याची काळजी समाजानेच घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.  
 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...