आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Responsible For Corruption In Electricity Dept. aap

अजित पवारांकडून ऊर्जा खात्यात 22 हजार कोटींचा भ्रष्टाचार- अंजली दमानिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऊर्जा मंत्री अजित पवार यांनी ऊर्जा खात्यात सुमारे 22 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आम आदमीच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीतील हा भ्रष्टाचार झाला असून, दुय्यम दर्जाचा कोळश्याच्या नावाखाली हा भ्रष्टाचार झाल्याचे अंजली दमानिया यांनी आरोप केला. काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांनी वीज दर कमी करण्याबाबत केलेले आंदोलन म्हणजे नाटक होते, असेही त्यांनी सांगितले.
जर अजित पवारांनी भ्रष्टाचार केला नसता तर राज्यातील विजेचे दर सध्या दरापेक्षा 50 टक्क्याने कमी असते. मात्र, कंपन्यांमार्फत अजित पवार हा भ्रष्टाचार करीत आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने आम आदमीचे व दमानिया यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.