आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला होता, अजित पवार यांची मुंबईत स्पष्टोक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेस नेते नारायण राणे यांना निवडणूक न लढवण्याचा आपण सल्ला दिला होता, अशी स्पष्टोक्ती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.
पवार म्हणाले, राणेंनी निवडणुकीआधी मला दूरध्वनी केला होता तेव्हा, मी त्यांना ही निवडणूक लढवू नका, असे सांगितले होते. नुकताच एका निवडणुकीत तुमचा पराभव झाला आहे आणि वांद्रेचा मतदारसंघही तुमच्यासाठी पूर्णपणे नवा आहे. तेव्हा तुमच्यासारख्या मातब्बर नेत्याने ही निवडणूक लढवणे योग्य नाही, असे आपण राणेंना सुचवले होते.
मात्र, या भागात कोकणी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आपणच विजयी होऊ असे राणेंनी सांगितले होते. शेवटी निवडणूक लढवण्याचा राणेंचा वैयक्तिक निर्णय होता, असेही पवारांनी सांगितले. दरम्यान, वांद्रेच्या निकालानंतर अजूनही राणे आपल्या विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.