आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar, Sunil Tatkare At Thane For Nirdhar Melava

मराठा, मुस्लिमांना शरद पवारसाहेबांमुळेच मिळाले आरक्षण- अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- अजित पवार)
मुंबई- आम्ही विधानसभा निवडणुकीच्या कामाला जोमाने लागलो आहे. आघाडीतील जागावाटपाबाबत मी आमची भूमिका मांडली आहे. काँग्रेसने लवकराच लवकर जागा वाटपाची बोलणी सुरु करावीत असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुन्हा काँग्रेसला सांगितले. तसेच राज्यात मराठा व मुस्लिमांना आरक्षण शरद पवारसाहेबांमुळेच मिळाले आहे असेही अजितदादांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, मी 144 जागांची मागणी केली आहे. ते माझे वैयक्तिक मत होते आणि काँग्रेसवाले तसेच मानत असतील तर लवकरच पक्षाच्या वतीने आम्ही 144 जागा मागू व लवकराच लवकर जागा वाटपाची चर्चा सुरु करावी असे सांगू. लोकसभेला त्यांच्यापेक्षा आमच्या जागा जास्त आहेत त्यामुळे आम्ही बरोबरीच्या जागा मागत आहोत. त्यांनी नाही दिल्या तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. हे तुमचे वैयक्तिक मत आहे की पक्षाचे असे पत्रकारांनी छेडले असता अजित पवार यांच्याऐवजी तटकरेंनी माईक खेचत आम्ही 144 जागा मागणार आहोत. काँग्रेसने हा निर्णय मान्य न केल्यास त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असे सांगत तटकरेंनी वेळ मारून नेली. मात्र, अजित पवार व राष्ट्रवादीने आगामी आपली वाटचाल कशी राहील याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मराठा व मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकेल अशी आम्हाला खात्री आहे. आरक्षण देताना आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांना, वकिलांना विचारूनच मार्ग काढला आहे. हे आरक्षण मिळाल्याचे श्रेय शरद पवारसाहेबांना जाते असेही पवारांनी सांगितले.
पुढे वाचा, गणेश नाईक-डावखरे-आव्हाड यांच्यातील गटबाजी मोडून काढण्याकरिता निर्धार मेळावा...