आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Tables Rs 5,417 Cr Deficit Maharashtra Budget News In Marathi

केंद्राच्या सल्ल्याने कर्जात झाली वाढ;पवारांनी गायले आर्थिक शिस्तीचे गोडवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आम्ही आता खालचे राहिलो नाहीत तर वरचे झालो आहोत, त्यामुळे आम्हाला खुद्द केंद्र सरकारच आणखी कर्ज घ्यायला सांगते,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्य सरकारच्या अधिकाधिक कर्ज काढण्याच्या प्रक्रियेचे समर्थन केले. पावणेतीन लाख कोटींच्या कर्जाखाली असले तरी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असून आर्थिक शिस्तीत काम सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे.

राज्य एकीककडे पावणेतीन लाख कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिकाधिक लोकप्रिय निर्णय घेण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. मतांच्या बेगमीसाठी सरकारने आता अंतरिम अर्थसंकल्पातही भरमसाट खर्च केल्याच्या विरोधकांच्या टीकेकडे अजित पवार यांचे लक्ष वेधले असता त्यांनी कर्जाची मर्यादा अजूनही शिल्लक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर 1999 पर्यंत विरोधी पक्षाचे सरकार सत्तेवर असताना राज्याच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत एकूण कर्जाचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षाही जास्त होते. याउलट सध्या केंद्राने आम्हाला 25.5 टक्क्यांची मर्यादा सध्या घालून दिलेली असतानाही आम्ही राज्याच्या सध्याच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत फक्त 17.6 टक्के इतकेच कर्ज उचलले आहे, असा खुलासा पवारांनी केला. ज्या ज्या वेळी आम्ही एखाद्या विकास कामासाठी केंद्राकडून अधिक निधीची मागणी करतो, त्या त्या वेळी केंद्र सरकार आम्हाला सांगते की तुमच्या राज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे. त्यामुळे आमच्याकडून निधी घेण्यापेक्षा खुल्या बाजारातून कर्ज उचला असाही सल्ला दिला जातो. त्यामुळे राज्यावरचा कर्जाचा बोजा वाढला.

आर्थिक शिस्त
कर्जाप्रमाणेच अन्य आर्थिक निकषांवर राज्य सरस असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्र्यांनी केला. सकल राज्य उत्पन्नाच्या 3 टक्क्यांपर्यंत राहू शकते. मात्र राज्याची ही तूट केवळ 1.6 टक्केच आहे. महसुली उत्पन्नाच्या 20 टक्क्यांपर्यंत पैसे व्याजाची परतफेड करण्यासाठी वापरता येतात. आपण केवळ 13.53 टक्केच पैसा परतफेडीवर खर्च करतो.