आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार, तटकरेंच्या चौकशीला येणार वेग; राजकीय फायद्यावर भाजपचे लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुमारे ७० हजार काेटींवर सिंचन घोटाळ्याचे आरोप असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे या राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या दाेन प्रमुख नेत्यांविराेधात अाता कारवाईला वेग येण्याची चिन्हे अाहेत. सत्तेवर येण्यापूर्वी या दाेघांनाही तुरुंगात धाडण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत अाल्यानंतर मात्र गेल्या तीन वर्षांत मात्र ठाेस कारवाई केली नाही. त्यामुळे फडणवीस सरकार तटकरे- पवारांना अभय देत असल्याचे अाराेपही झाले. मात्र अाता उशिरा का हाेईना मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घातले असून नुकताच त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल त्यांनी मागवून घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.    

विदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वीच फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली होती. आता त्यांनी याविषयीचा अहवाल मागून घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे ही कुणकुण लागताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्याना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप ही भेट होऊ शकली नसल्याचे समजते.    

शेतकरी कर्जमाफीवरून भाजपवर आसूड ओढण्यासाठी पवार, तटकरे राज्यभर फिरत असून यामधून हे दोघे नेते जनतेत सरकार विरोधात असंतोष वाढत आहेत. याशिवाय राज्यात भाजप विरोधात वातावरण तयार होत असताना त्याचे प्रतिबिंब सोशल मीडियातही दिसून येत आहे. त्याला कलाटणी देण्यासाठी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल मागवून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार आहे.   

राजकीय फायद्यावर भाजपचे लक्ष  
सिंचन घाेटाळा चाैकशीचा वेग कधी वाढवायचा याचे गणित भाजपकडून आखण्यात आल्याचे कळते  निवडणुकांच्या पूर्वी चौकशी होऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई झाल्यास त्याचा भाजपला फायदा होईल, असा सत्ताधाऱ्यांचा अंदाज आहे. यामुळे योग्य वेळी योग्य पावले उचलली जात असून राष्ट्रवादीवर दबाव कधी आणायचा याचे गणित स्वत: मुख्यमंत्र्यांनी केले असल्याचे समजते.
बातम्या आणखी आहेत...