आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Upset On Uddhav Over On Critcis On Uncle Sharad Pawar

उद्धव ठाकरेंनी काकांवर केलेली टीका पुतण्या अजित पवारांना झोंबली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत काल सायंकाळी सेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पुतणे अजित पवार नाराज झाले आहेत. सेनेच्या दसरा मेळाव्यात पवारांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्त्वकांक्षेला 'म्हातारा नवरा सगळीकडे बाशिंग' असे म्हणत टीकास्त्र सोडले होते.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार सेनेचे उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत. वरिष्ठांचा मान ठेवत भाष्य करा. बाळासाहेब व पवारांची मैत्री होती हे ही लक्षात असू द्या. आम्ही पण सभा घेतो भाषणे करतो असं म्हणत या वक्तव्याचा योग्य वेळी समाचार घेऊ, असे अजित पवारांनी नाराजीच्या सुरात सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला पवार यांनी वक्तव्याचीच किनार होती. शरद पवार यांनी मागील आठवड्यात नरेंद्र मोदींवर टीका करताना 'उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग' असे वक्तव्य केले होते. त्याचाच संदर्भ घेत उद्धव यांनी पवारांना काल दसरा मेळाव्यात लक्ष केले होते. नरेंद्र मोदी जसे पंतप्रधानपदासाठी गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करीत होते. तसाच प्रयत्न शरद पवार गेली काही वर्षे करीत आहेत. किंबहुना, काँग्रेसमधून बाहेर पडत पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यासाठीच केली असल्याचे आजही बोलले जाते.
आणखी पुढे वाचा...