आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अखंड महाराष्ट्र’वर परिषद अडली, ‘वाघ कुणी खाल्ला...’घोषणेतून सेनेला भडकावण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी विधान परिषदेत सदस्यांनी कामकाज रोखून धरले. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही काही भाजपवाले स्वतंत्र विदर्भाची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच अखंड महाराष्ट्राचा ठराव दोन्ही सभागृहात मांडावा या मागणीसाठी विरोधकांनी परिषदेत कामकाज होऊ दिले नाही. शिवसेना सदस्य या भूमिकेपासून ऐनवेळी दूर राहिल्याने ‘वाघ कोणी खाल्ला...सिंहाने खाल्ला, वाघाचं काय झालं.....शेळी झाली’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिवसेनेला भडकावण्याचा प्रयत्न केला.
परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी बोलायला सुरुवात केली. विरोधी बाकांवरून अखंड महाराष्ट्राच्या घोषणा सुुरुच राहिल्यामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांनी सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू होताच तटकरे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. राज्याच्या स्थापनेपासून विविध शक्तींनी महाराष्ट्र तोडण्याचे प्रयत्न केले. आता भाजपा सत्तेत आल्यापासून वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरू आहे. शुक्रवारी भाजप खासदाराने लोकसभेत अशासकीय ठरावाद्वारे वेगळ्या विदर्भाचा ठराव मांडला. हा अशासकीय ठराव मांडला तरी तो सत्ताधारी सदस्यांनी मंजूर केला तर तसा ठराव राज्याकडे येऊ शकतो, असे ते या वेळी म्हणाले. त्यामुळे अखंड महाराष्ट्राबाबत चर्चेला परवानगी देण्याची मागणी तटकरे यांनी केली.

शेकापचे जयंत पाटील यांनीदेखील अखंड महाराष्ट्रावरील चर्चेची मागणी केली. मात्र सभापतींनी ही सूचना फेटाळल्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला. अखंड महाराष्ट्राच्या चर्चेच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशी चार वेळा सभागृह तहकूब झाले.
पुढे वाचा...
> छाती फाडून सांगायचे का?
> पुन्हा निवडणूका घ्या
> ठराव दोन्हीकडे आणा
> शिवसेनेचा नकार
> आल्या पावली कन्हैया परत...!
बातम्या आणखी आहेत...